०२० - २६६१०१०९४ / ०२० - २६६८०१७६
 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,पुणे. |

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,पुणे

आपले स्वागत करीत आहे.मनोगत


Untitled Document
श्री.सौरभ राव, भा प्र से जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद पुणे.
व्यायामाद्वारे सर्वासाठी सद्रुढता हा मूलमंत्र वाढीस लागण्यासाठी व्यायामाची आवड व त्याचे महत्व जतन करणे आवश्यक आहे.चालणे ,धावणे ,योगासन ,सर्य नमस्कार विविधखेळ याद्व्यारे निरोगी राहण्यासाठी व सद्रुढता वाढीस लागण्यास मदत होणार आहे .जागतिकीकरणाच्या युगामध्ये शारीरिक आरोग्य संतुलित राहण्यासाठी व ताण-तणाव कमी करण्यासाठी खेळाचे व निरोगी राहण्याचे महत्व जपणे आवश्यक आहे. विद्यार्थी ,युवक शिक्षणामध्ये तसेच नागरिक त्यांचे दैनंदिन कामकाजामध्ये व्यस्त असतात ,आरोग्यासाठी वेळेचे नियोजन केल्यास व्यायामाची आवड जोपार्येंत सधृढता व कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल . देशाच्या व राज्याच्या विकास प्रक्रियेमधे सक्षम मनुष्यबळ असणे आवश्यक आहे.अंतराष्ट्रीये योगदिन दि .२१ जून रोजी साजरा करण्यात येत आहे.योगाभ्यास प्रतिकात्मक न राहता योगविधेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शाशनाने शैक्षनिक संस्था व शाळांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेस योग दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे.सर्वांनी अश्या उपक्रमाची सहभागी होणे आवश्यक आहे.

   अधिक माहिती


Untitled Document पुणे जिल्हास्तर स्पर्धा वेळापत्रकामध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असून बदल नोंद घेणेसाठी वेबसाईट ला भेट देणे. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सुधारीत कार्यक्रमाची नोंद घ्यावी.. स्पर्धा विषयक ऑनलाईन माहिती भरणेकामी काही तांत्रिक अडचणी असल्यास 9867561623 & 75069 69542 या क्रमांकावर संपर्क साधावा. विभागीय व राज्यस्तर स्पर्धा कार्यक्रम बाबत जाहीर झालेल्या किंवा अगामी होत असलेल्या विभाग व राज्य स्पर्धांचा कार्यक्रम वेबसाईटवर अपडेट करण्यात येत आहे. सर्व खेळाडू, पालक, क्रीडा शिक्षक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सदर कार्यक्रमाची नोंद घ्यावी. वेबसाईट वर क्रीडा स्पर्धा – स्पर्धा कार्यक्रम – विभागीय / राज्य स्पर्धा या प्रमाणे कार्यक्रम पाहता येईल. .. राष्ट्रीय शालेय स्पर्धा 2017-18 ओळखपत्र सुधारीत नमुना संकेतस्थळावरील अर्ज नमुने या शिर्षकांतर्गत उपलब्ध आहे.

शुभेच्छा संदेश


Untitled Document
मा.मुक्ता टिळक,महापौर पुणे महानगर पालिका
क्रीडा क्षेत्रातील नव्या नव्या बदलांना हाताळण्या करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे सज्ज होत आहे. या सुविधांमध्ये वेळोवेळी आवश्यक्तेनुसार बदल व सुधारणा करण्यात येणार आहे. क्रीडा प्रेमी व खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधीत सर्व मान्यवरांचे अभिप्राय या करिता मार्गदर्शक ठरणार आहेत.खेळाडू, शिक्षकांसाठी व संघटक, संघटना यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, तसेच पुण्याच्या क्रीडा क्षेत्रावर प्रकाशझोत येईल अशी आशा आहे…
Untitled Document
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही एक औद्योगिकनगरी आहे .ती ‘क्रीडानगरी’म्हणून ओळखली, जावी खेळांचा प्रचार व प्रसार व्हावा या करिता पिंपरी चिंचवड महानगर्पालिका १९९४ पासून विशेष कार्य करीत आहे.
मा.नितीन काळजे,महापौर पिंपरी चिंचवड महानगर पालिका


Untitled Document
कुणाल कुमार, भा प्र से आयुक्त पुणे महानगर पालिका
पुण्यनगरी शैक्षणिक, सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जातानाच देशातील क्रीडानगरी म्हणून देखील नावारुपास आली आहे. पुणे शहराच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा स्वतंत्र असा ठसा संपूर्ण भारतभर उमटला आहे.
Untitled Document
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही एक औधोगिक नगरी म्हणून विकास पावली असताना मानवाची क्रीडा ,कला व सांस्कृतिक भूक भागवण्याची गरज म्हणून क्रीडा,कला ,साहित्य व सांस्कृतिक धोरण राबविणारी राज्यातील पहिली महानगरपालिका उदयास येत असल्याचा मलाअभिमान आहे.
श्री श्रावण प्रमोद हर्डीकर,भा प्र से आयुक्त पिंपरी चिंचवड महानगर पालिका

Untitled Document
श्री.विजय संतान,जिल्हा क्रीडा अधिकारी तथा सदस्य-सचिव जिल्हा क्रीडा परिषद पुणे .
महाराष्ट्रात भौगोलिक तसेच आर्थिक स्थिती नुसार जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. क्रीडा क्षेत्रातील नव्या नव्या बदलांना हाताळण्या करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे सज्ज होत आहे. या सुविधांमध्ये वेळोवेळी आवश्यक्तेनुसार बदल व सुधारणा करण्यात येणार आहे. क्रीडा प्रेमी व खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधीत सर्व मान्यवरांचे अभिप्राय या करिता मार्गदर्शक ठरणार आहेत. मला खात्री आहे की, हे संकेत स्थळ सर्वांसाठी विशेषतः खेळाडू, शिक्षकांसाठी व संघटक, संघटना यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, तसेच पुण्याच्या क्रीडा क्षेत्रावर प्रकाशझोत येईल अशी आशा आहे…
  
   अधिक माहिती
Untitled Document
  • शिवापूर दर्गा

  • फर्ग्युसन कॉलेज

  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

  • सिंहगड किल्ला

  • rrr